HSRP नंबर प्लेट ; किती खर्च येतो ? नसेल तर किती दंड लागेल..पहा सविस्तर

HSRP नंबर प्लेट ; किती खर्च येतो ? नसेल तर किती दंड लागेल..पहा सविस्तर

 

हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, ज्याला आपण HSRP म्हणतो, ही एक खास प्रकारची नंबर प्लेट आहे.(व्हेईकल रजिस्ट्रेशन प्लेट) ही प्लेट इतर नंबर प्लेट्सपेक्षा अधिक सुरक्षित असते, कारण यात अनेक सुरक्षा फीचर्स असतात. त्यामुळे गाडीची चोरी झाली किंवा तिचा चुकीच्या कामासाठी वापर केला गेला, तर हे सहजपणे ओळखता येतं. ही प्लेट बसवण्याचा मुख्य उद्देश वाहनांची सुरक्षितता वाढवणे आणि गुन्हेगारीला आळा घालणे हा आहे.

 

कोणत्या वाहनांना HSRP प्लेटची गरज आहे?

 

जर तुमची गाडी १ एप्रिल २०१९ पूर्वीची असेल, तर तुमच्या गाडीवर HSRP नंबर प्लेट असणं बंधनकारक आहे. यामध्ये दुचाकी, कार, ट्रक, रिक्षा अशा सगळ्या जुन्या वाहनांचा समावेश होतो. पण, जर तुमची गाडी १ एप्रिल २०१९ नंतरची असेल, तर तुम्हाला वेगळी HSRP प्लेट बसवायची गरज नाही. कारण, अशा सर्व नवीन गाड्यांवर HSRP प्लेट बसवून मिळते.

 

HSRP प्लेट नसेल तर किती दंड भरावा लागेल?

 

जर तुमच्या जुन्या गाडीवर HSRP प्लेट नसेल, तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. हा दंड ५,००० ते १०,००० रुपयांपर्यंत असू शकतो. त्यामुळे हा नियम पाळणं खूप गरजेचं आहे, नाहीतर तुमच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते.

 

महाराष्ट्रात HSRP प्लेटचा खर्च किती आहे?

 

महाराष्ट्रामध्ये HSRP प्लेटचा खर्च गाडीच्या प्रकारानुसार वेगळा आहे. यात जीएसटीचा देखील समावेश आहे.

मोटरसायकल आणि स्कूटरसाठी: ₹५३१

ऑटोरिक्षासाठी (तीन चाकी): ₹५९०

कार आणि मोठ्या वाहनांसाठी (चारचाकी): ₹८७९

Leave a Comment