Corp loan : पिककर्ज वसुलीला स्थगिती, मोठा निर्णय…पहा कधीपर्यंत ?
अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्जमाफीची मागणी केली होती,मात्र, या पॅकेजमध्ये थेट कर्जमाफी न करता वाढीव अनुदान, रबी पिकांसाठी मदत आणि खरडून गेलेल्या जमिनीसाठी भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाने योग्य वेळ आल्यावर कर्जमाफीचे आश्वासन दिले असले तरी, सद्यस्थितीत कर्जमाफी नाही हे स्पष्ट झाले आहे.
कर्जमाफी न झाल्यामुळे, अतिवृष्टीचे अनुदान किंवा पीक विम्याचे पैसे आल्यावर बँका लगेच वसुली करतील अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात होती . यावर दिलासा देण्यासाठी शासनाने बाधित तालुक्यांमधील शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वाच्या सवलती दिल्या आहेत. पहिली आणि सर्वात मोठी सवलत म्हणजे पीक कर्जाच्या वसुलीला एक वर्षासाठी स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे पूर ओसरत असताना आलेल्या बँकांच्या वसुलीच्या नोटिसांचा पाश थांबणार आहे.
दुसरी सवलत म्हणजे जे शेतकरी थकबाकीदार नाहीत पण नुकसान झाल्यामुळे कर्ज भरू शकत नाहीत, त्यांच्यासाठी पीक कर्जाचे पुनर्घटन (Loan Restructuring) करण्याचा पर्याय उपलब्ध , ज्याद्वारे कर्ज मध्यम किंवा दीर्घ मुदतीत बदलले जाऊ शकते. तथापि, पुनर्घटन केल्यास भविष्यातील कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावा.
अनुदानाची रक्कम सुरक्षित