राज्यात पुन्हा पाऊस, शेतकऱ्यांनो शेतीची कामे लवकर आवरा..पंजाबराव डख
हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी १६ तारखेपर्यंत आपली सर्व कामे, विशेषतः सोयाबीन काढणी आणि सुरक्षित ठिकाणी साठवण्याचे काम पूर्ण करून घ्या, कारण १७, १८ आणि १९ तारखेला राज्यात पाऊस येन्याची शक्यता आहे असे पंजाब डख यांनी सांगितले…
राज्यात पावसाचा अंदाज
पावसाची सुरुवात १६ तारखेला यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर (तेलंगणा/कर्नाटककडून) होताना दिसेल. मराठवाड्यातही १७ तारखेपासून भाग बदलत पावसाला सुरुवात होईल. परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, धाराशिव, बीड, जालना, आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस भाग बदलत पडेल, परंतु प्रत्येक जिल्ह्यात हजेरी लावेल. (50% गावात) विदर्भ, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, आणि कोकणपट्टीतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे असेही पंजाब डख म्हनाले.
हा पाऊस १९ तारखेपर्यंत चालेल आणि त्यानंतर वातावरण पुन्हा उघडणार आहे. दिवाळीमध्ये पावसाचे वातावरण नसेल अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.
चक्रीवादळाचा धोका ; पंजाबराव डख
पंजाब डख यांनी एक मोठे चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता वर्तवली आहे, ज्याची दिशा महाराष्ट्राकडे आहे. हे चक्रीवादळ महाराष्ट्रातून धुमाकूळ घालून जाणार असून, त्यामुळे जोरदार पाऊस पडन्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव नांदेड, यवतमाळ, हिंगोली, सोलापूर, बीड, नगर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये जाणवू शकतो.