या लाडक्या बहीणींच्या खात्यात 6000 एकदाच जमा, तात्काळ हे काम करा..
या लाडक्या बहीणींच्या खात्यात 6000 एकदाच जमा, तात्काळ हे काम करा..
Read More
Corp loan : पिककर्ज वसुलीला स्थगिती, मोठा निर्णय…पहा कधीपर्यंत ?
Corp loan : पिककर्ज वसुलीला स्थगिती, मोठा निर्णय…पहा कधीपर्यंत ?
Read More
जमीन खरेदी-विक्री करताय का? सरकारचा मोठा निर्णय, नवीन नियम काय असणार ?
जमीन खरेदी-विक्री करताय का? सरकारचा मोठा निर्णय, नवीन नियम काय असणार ?
Read More
दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
Read More

कापूस भावात घसरण, हमीभावानं कापूस विकन्यासाठी हे काम करावं लागनार

कापूस भावात घसरण, हमीभावानं कापूस विकन्यासाठी हे काम करावं लागनार

महाराष्ट्रातील ३ लाख २५ हजारांहुन अधिक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी घसरलेल्या बाजारभावामुळे हमीभावावर म्हणजेच ८ हजार ११० रुपये प्रति क्विंटल दराने कापूस विक्रीसाठी सीसीआय मध्ये नोंदणी केली आहे.केंद्र सरकारच्या कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत १५ ऑक्टोबरपासून खरेदी सुरू होणार असून, यासाठी ‘कपास किसान’ अॅपद्वारे नोंदणी बंधनकारक आहे.

कापूस नोंदणीसाठी नवीन अॅप

यंदा सीसीआयने शेतकऱ्यांसाठी ‘कपास किसान’ नावाचे नवीन अॅप सुरू केले आहे, ज्याद्वारे शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी नोंदणी करावी लागते. सुरुवातीला काही अडचणी आल्या असल्या, तरी आता नोंदणी प्रक्रियेला गती मिळाल्याच प्रशासनाच म्हणन आहे. देशभरात २० लाख शेतकऱ्यांनी या अॅपद्वारे नोंदणी केली असून, त्यापैकी ३ लाख २५ हजार नोंदण्या एकट्या महाराष्ट्रातून आहेत. नोंदणीसाठीची मुदत आता ३० सप्टेंबरपासून वाढवून ३१ ऑक्टोबरपर्यंत करण्यात आली आहे.

नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया

नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी राज्य सरकारकडून केली जाते. ही पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय खरेदी प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही, असे सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी महाराष्ट्र सरकारने कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) ला शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी करण्याचे अधिकार दिले आहेत. यामुळे सरकारी यंत्रणांवरील ताण कमी होण्यास मदत होईल.

शेतकऱ्यांची संख्या आणि क्षेत्र

राज्याच्या कृषी खात्याच्या म्हणण्यानुसार, एकट्या नागपूर जिल्ह्यात कापसाखाली ६ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र आहे. एकट्या नागपूरमध्येच सुमारे १ लाख ३० हजार शेतकरी असतील. याशिवाय यवतमाळसारख्या कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. यामुळे ३ लाख २५ हजार शेतकरी नोंदण्या असल्या तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांची संख्या यापेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment