लाडकी बहिण ekyc करताना हि चुक कराल तर, हप्ते होतील बंद
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
लाडकी बहिण योजनेच्या पोर्टलवर eKYC करत असताना, लाभार्थ्यांना दोन अत्यंत महत्त्वाचे प्रश्न विचारले जात आहेत, ज्यांची उत्तरे योग्यरित्या देणे अनिवार्य आहे. अनेक लाभार्थी घाईत किंवा माहितीच्या अभावी चुकीची उत्तरे निवडत आहेत, ज्यामुळे त्यांचे ₹1500 चे अनुदान बंद होण्याची शक्यता आहे.
eKYC मध्ये विचारलेल्या या दोन प्रश्न आणि त्यांची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत..👇
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
1.(पहिला प्रश्न): कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत/पेन्शन घेत नाहीत योग्य उत्तर (बहुतांश लाभार्थ्यांसाठी): जर तुमच्या कुटुंबात कोणीही सदस्य सरकारी नोकरीत (कायम कर्मचारी) नसेल किंवा निवृत्तीनंतर पेन्शन (निवृत्ती वेतन) घेत नसेल, तर तुम्हाला ‘होय’ (Yes) निवडायचे आहे.बहुतांश लाभार्थ्यांनी पहिल्या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असेच निवडायचे आहे.
2. (दुसरा प्रश्न): कुटुंबातून केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला लाभ घेत आहे
योग्य उत्तर (बहुतांश लाभार्थ्यांसाठी): योजनेचा नियम आहे की एका कुटुंबातून जास्तीत जास्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेऊ शकते. जर तुमच्या कुटुंबातून खरोखरच ही अट पूर्ण होत असेल, म्हणजेच नियमानुसार फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत असेल, तर तुम्हाला ‘होय’ (Yes) निवडायचे आहे.
eKYC करण्याची प्रक्रिया अचूक आणि काळजीपूर्वक पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा तुमचे अनुदान बंद होऊ शकते. eKYC करण्यासाठी लाभार्थ्यांना दोन महिन्यांचा पुरेसा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे घाई-गोंधळ न करता, व्यवस्थित माहिती समजून घेऊन ‘होय’ किंवा ‘नाही’ निवडा. या eKYC प्रक्रियेमुळे कुटुंबातील पती किंवा वडिलांचे आधार कार्ड प्रमाणीकरण होत आहे, ज्यामुळे फक्त पात्र महिलांनाच पुढे लाभ मिळेल आणि अपात्र महिला योजनेतून बाद होनार आहेत.