खतांच्या भावात पुन्हा वाढ, पहा कोनते खत किती रूपयांना ?
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
शेतकरी आधीच अतिवृष्टी, कीडरोग, बाजारभावातील अनिश्चितता अशा संकटांना तोंड देत असताना, आता रासायनिक खतांच्या दरवाढीने शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. ऐन हंगामात अचानक दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. खतांमध्ये प्रति बॅग मागे २०० ते ३०० इतकी दरवाढ झाली आहे.
विविध मिश्र खतांचे दर वाढले, परंतु शेतीमालाचे भाव अजूनही म्हणावे तसे वाढले नाहीत. कापूस, सोयाबीन, भाजीपाला, अशा प्रमुखपिकांना बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना हंगामाचा हिशेब जुळवणे कठीण झाले आहे. आता रब्बी हंगाम पुढे येऊन ठेपला आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
गहू, हरभरा आदी पिकांना खताची गरज भासणार आहे. येणाऱ्या काळात अजूनही पुन्हा खताच्या दरात वाढ होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
कृषी विक्रेत्यांना विविध कंपन्यांकडून खतांसोबत वॉटर सोल्युबल खत, मायक्रोला, मायक्रोराईझा आदींचे लिंकिंग केल्या जाते. शेतकऱ्यांकडून या लिंकिंग प्रॉडक्ट चा ‘उठाव नसल्याने तो माल ईतर खतासोबत माथी बसल्या जातो.
युरिया खत २६६ रुपयांच्या वर विक्री करू नये असे निर्देश आहे. परंतु युरिया वाहतुकी साठी भाडे देत नसल्याने प्रत्येक पोत्यामागे दहा ते वीस रुपये ज्यादा दराने दुकानदारांना नाईलाजाने विक्री करावी लागत असल्याच्या प्रतिक्रिया दुकानदारांनी दिल्या आहे. जादा दराने विक्री झाल्यास शेतकऱ्याकडून ही ओरड केल्या जाते. लिंकिंग मुळे दुकानदारांकडूनही मोजक्याचं खताचा उठाव केला जातो. परिणामी बाजारात खतांचा तुटवडा निर्माण होत आहे.
रासायनिक खतांचे वाढलेल्या दराचा दैनंदिन उलाढालीवरही प्रतिकूल परिणाम होत आहे. रासायनिक खतांचे दर संतुलित असणे नितांत गरज आहे. खतांच्या दरामुळे मागणी कमी होत आहे. उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. खत, औषधे, मजुरी सर्व वाढली, पण पिकांना भाव नाही. शेती आता उघड्यावरच्या जुगारासारखी झाली आहे. शासनाने रासायनिक खतांच्या दरांना लगाम घालण्याची गरज आहे. प्रत्यक्ष पिकांच्या हंगामी गरजेला आवश्यक असलेले खत शेतकऱ्यांना जादा दराने घ्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले.