लाडकीचे 1500 वाटप आजपासून सुरू, पहा तुम्हाला कधी येनार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे अशी माहिती आदीती तटकरे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील २ महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती…(आदीती तटकरे)
मोबाईलवर ई केवायसी अशी करा – येथे क्लिक करा
सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी ई केवायसी ची अट आसनार नाही, ई केवायसी न केलेल्या महिलांनाही हा सप्टेंबर चा हप्ता दिला जानार आहे. मात्र पुढील हप्ते चालू राहन्यासाठी महिलांनी वेळेत ekyc पुर्ण करून घ्यावी असे आदीती तटकरे म्हनाल्या…