नुकसान भरपाई दोन हेक्टरसाठी की तीन हेक्टरसाठी, देवेंद्र फडणवीस म्हनाले
राज्यातील अतिवृष्टीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच घोषणा करत दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंतच्या नुकसानावर शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मदतीच्या रक्कमेत वाढ
मुख्यमंत्र्यांनी नुकतेच जाहीर केलेल्या पॅकेजानुसार, कोरडवाहू क्षेत्र : १८ हजार ५०० रु. प्रति हेक्टर, बारमाही बागायती क्षेत्र : २७ हजार रु. प्रति हेक्टर, बागायती क्षेत्र : ३२ हजार ५०० रु. प्रति हेक्टर…….पूर्वीच्या निकषानुसार केवळ ८ हजार ५०० रु. प्रति हेक्टर मदत मिळत होती.
मात्र संपूर्ण नुकसान ग्राह्य नाही
सरकारने मदत देण्याची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत ठेवली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांचे १० ते २० एकर क्षेत्राचे नुकसान झाले असले, तरी त्यांना केवळ ७.५० एकर क्षेत्रावरच नुकसानभरपाई मिळणार आहे. उर्वरित नुकसान त्यांना स्वतः सहन करावे लागणार आहे.
शेतकऱ्यांसाठी थोडासा दिलासा
अतिवृष्टी, कीडनाशक खर्च आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात सकारात्मक आणि दिलासादायक ठरणार आहे. मात्र, प्रत्यक्ष मदत केव्हा आणि कशी मिळते, हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.