केंद्र सरकारचा मोठा निर्णय; पीक विम्यात होणार महत्वाचे बदल..
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
सध्या राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत पिकांचा विमा काढण्यात येतो. याची नुकसानचे पंचनामे, अहवाल आणि पडताळणी अशी लांबी प्रक्रिया आहे. या प्रक्रीयेत बराच काळ निघून जातो. आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करण्यात विलंब होतो. केंद्राची नवीन योजना मात्र अधिक वेगवान आणि पारदर्शक असणार आहे.
या योजनेअंतर्गत, कोणत्याही भागात अपेक्षेपेक्षा कमी किंवा जास्त पाऊस झाल्यास, तपमानाने ठराविक मर्यादा पार केल्यास तसेच वाऱ्याचा वेग मर्यादेपेक्षा वर गेल्यास विमा कंपण्याकडून स्वयंचलितपणे भरपाईची रकम देण्यात येईल. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना यासाठी कुठलाही अर्ज किंवा कागदपत्र भरण्याची गरज भासणार नाही.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
अशी योजना राबवणार भारत एकमेव देश नाही. फिजी या देशांने सर्वप्रथम हि योजना राबवली होती. फिजी मध्ये शेतकऱ्यांना याचा मोठ्याप्रमाणावर फायदा झाला होता. केंद्र सरकारने फिजी देशातील ह्या योजनेचा अभ्यास केल्या नंतरच याला भारतात राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही काळापासून भारतात मोठ्या प्रमाणावर हवामान बदल होताना दिसत आहे. काही भागात दुष्काळ तर काही भागात अतिवृष्टी. यावेळी पावसाने मोठा धुमाकुळ घातला आहे. यावर्षीही भारतातील शेतीसाठी महत्वाच्या असणाऱ्या राज्यात मोठ्याप्रमाणावर अतिवृष्टी झाली.
महाराष्ट्रात मराठवाडा, सांगली, सातारा अशा भागात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान केले आहे. (Maharashtra Pik Vima Yojana)
अशातच, परिस्थितीचा आढावा घेत केंद्र सरकार ‘हवामान आधारित विमा योजना’ सुरु करण्याचा विचार करत आहे. या योजनेच्या माध्यमातून अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट आणि अवकाळी पावसाने होणाऱ्या पीक नुकसानाला कमी करण्याचा आणि शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्याच्या उद्दिष्टांना साध्य करता येऊ शकते. हवामान बदलाचा सर्वात जास्त परिणाम शेती आणि संबंधित व्यवसायांवर होतो. त्यामुळे त्यांना तात्काळ मदत होणे महत्वाचे असते. ७ ऑक्टोबरला महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीविषयी जाहीर प्रेस कॉन्फरेन्स केली. त्यातहि शासनाकडून शेतकऱ्यांना त्वरित मदत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
जगभरात ग्लोबल वॉर्मिंगचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा आणि उत्तर भारतातील हवामानात मोठ्याप्रमाणावर फेरबदल झाला आहे. अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. काही रिपोर्ट्सनुसार हवामान बदलाचा विपरीत परिमाण झालेल्या देशांच्या यादीत भारताचा सहावा क्रमांक आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
पीकं, पशुधन आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तसेच सार्वजनिक सुविधा आणि अर्थव्यवस्थेचे नुकसान अशा अनेक अडचणींना कारणीभूत म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. पावसाळ्यात दुष्काळ आणि उन्ह्याळात पाऊस अशा परिस्थितीसाठी ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा हात असल्याचे तज्ञ्यांचे म्हणणे आहे. (Maharashtra Pik Vima Yojana)
एकंदरीतच परिस्थिती पाहता केंद्र सरकारने ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. बदलत्या हवामानाचे संकट पार करण्यासाठी हवामान आधारित विमा योजना उपायकारक ठरू शकते. सध्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अर्थ मंत्रालय आणि विमा कंपन्यांमध्ये चर्चा सुरु झाली असून लवकरच यावर निर्णय घेण्यात येणार आहे.