कमी दाबाचे क्षेत्र ; महाराष्ट्रात पाऊस घालनार धुमाकूळ, या तारखेपर्यंत

कमी दाबाचे क्षेत्र ; महाराष्ट्रात पाऊस घालनार धुमाकूळ, या तारखेपर्यंत

 

बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज (बुधवार) संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

 

आजचा (बुधवार) पाऊस:

 

मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशीव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

विदर्भ: अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्र: पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गुरुवारचा पाऊस:

मराठवाडा: परभणी, हिंगोली, नांदेड आणि धाराशीव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

विदर्भ: चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून, भंडारा, अमरावती, अकोला, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

मध्य महाराष्ट्र आणि कोकण: कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

शुक्रवारपासून वाढणार जोर

शुक्रवारपासून मात्र संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. शनिवारी मराठवाड्यातील लातूर, धाराशीव जिल्ह्यांसह कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूरच्या घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

मान्सून माघारी: मान्सूनने पंजाब, हरियाणा, चंदीगढ आणि दिल्लीच्या काही भागातून माघार घेतली आहे. तसेच गुजरात आणि राजस्थानच्या काही भागासह मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या काही भागातूनही मान्सून परतला आहे . पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून आणखी काही भागातून निरोप घेण्यास वातावरण पोषक असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे .

Leave a Comment