पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज: राज्यात पाऊस विश्रांती घेणार ! कधीपासून ?
शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातून पाऊस लवकरच सुट्टीवर जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांची कामे नियोजित वेळेत पूर्ण करता येणार आहेत असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.
30 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या काळात राज्यात पाऊस विश्रांती घेईल. या काळात शेतकरी आपली सोयाबीन काढू शकतात आणि इतर पिकांवर फवारण्या देखील करू शकतात.
10, 11 आणि 12 ऑक्टोबर दरम्यान पुन्हा एकदा हलका पाऊस येण्याची शक्यता आहे, परंतु त्याचे प्रमाण जास्त नसेल. याबद्दलचा सविस्तर अंदाज लवकरच जाहीर केला जाईल अशी माहिती डख यांनी दिली आहे..
फक्त एवढे दिवस पाऊस…
राज्यात 30 सप्टेंबर पर्यंत मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडनार आहे.हा पाऊस खुपच मुसळधार आसनार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः ची आणि जनावरांची काळजी घ्यावी… विजा चमकत आसताना घराबाहेर पडू नका असा सल्ला पंजाब डख यांनी दिला आहे.
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे. 26 तारखेपासून पाऊस आनखी जोर धरनार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सतर्क रहावे…- पंजाब डख