अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर, पहा कोनाला किती मिळनार

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर, पहा कोनाला किती मिळनार

 

अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) झालेल्या नुकसानीसाठी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करण्यात आली आहे. या मदतीमध्ये पिकांच्या नुकसानीसोबतच मनुष्यहानी आणि पशुधनाच्या नुकसानीचाही समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही मदत दिली जानार आहे..

 

कोनत्या शेतकऱ्यांना किती मदत दिली जानार...

 

कोरडवाहू पिकांसाठी प्रति हेक्टर ₹८,५०० रुपये, तर बागायती पिकांसाठी प्रति हेक्टर ₹१७,००० रुपये इतकी मदत दिली जाईल.

 

बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर ₹२२,५०० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. शेतीयोग्य नसलेल्या जमिनीसाठी देखील मदत जाहीर झाली आहे. खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टर ₹१८,००० रुपये आणि दुरूस्त न होणाऱ्या जमिनीसाठी प्रति हेक्टर ₹४७,००० रुपये मदत देण्यात येईल.

 

मनुष्यहानी व जनावरांसाठी विशेष मदत

 

अतिवृष्टीदरम्यान दुर्दैवाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना चार लाख रुपये इतकी मदत दिली जाणार आहे. पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांसाठीही विशेष तरतूद आहे.

 

दगावलेल्या दुधाळ जनावरांसाठी ₹३७,५०० रुपये आणि ओढ काम करणाऱ्या जनावरांसाठी ₹३२,००० रुपये मदत मिळेल. लहान जनावरांसाठी ₹२०,००० रुपये आणि शेळी, मेंढी, बकरे व डुक्कर दगावल्यास प्रत्येकी ४००० रुपये देण्याची तरतूद आहे. तसेच, कुक्कुटपालन (Poultry) करणाऱ्या शेतकऱ्यांना १०००० मदत मिळणार आहे.

 

घर आणि गोठ्याच्या नुकसानीची भरपाई

 

या मदतीमध्ये घरांचे आणि गोठ्यांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचाही विचार करण्यात आला आहे. कच्च्या घरांची पडझड झाल्यास ₹८,००० रुपये आणि पक्क्या घरांची संपूर्ण पडझड झाल्यास ₹१२,००० रुपये अशी मदत दिली जाईल. यासोबतच, गोठ्यांसाठी देखील ₹३,००० रुपये इतकी मदत जाहीर करण्यात आली आहे.

Leave a Comment