कापूस हमीभाव 8110 ; पण हमीभावानं कापूस विकन्यासाठी हे काम करावं लागनार
किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत कापूस विकण्यासाठी कपास किसान मोबाईल अँपवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करने आवश्यक आहे. सुरुवातीला १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत नोंदणी करन्याची मुदत होती..
मात्र कापूस शेतकरी आणि राज्य सरकारांच्या विनंतीनुसार, नोंदणीची अंतिम मुदत आता ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 31 आँक्टोंबर पर्यंत नोंदणी करता येनार आहे.
सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी नोंदणीची मुदत वाढ केल्याची नोंद घ्यावी आणि किमान आधारभूत किंमत (एमएसपी) अंतर्गत भारतीय कपास निगम (सीसीआय) ला त्यांचा कापूस विकण्यासाठी लवकरात लवकर ‘कपास किसान’ मोबाईल अँपवर नोंदणी करावी…
हमीभावानं कापूस विकन्यासाठी कपास किसान अँपवर नोंदणीबरोबरच कापूस पिकाची नोंद ई पिक पाहनीला आसने आवश्यक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ई पिक पाहनी केली नसेत तर 30 सप्टेंबरच्या आत करून घ्यावी…