बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा किती दिवस, हवामान तज्ञ काय सांगतात ?
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील 4 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट हवामान खात्याने जारी केलाय.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर ३० तारखेपर्यंत कायम राहील, असे IMD कडून सांगण्यात आले आहे. काही भागांत मेघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह ताशी ३० ते ४० किमी प्रतितास वारे वाहतील, असा अंदाज आहे. या कालावधीत विजा चमकण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
रेड अलर्ट ; पुढील काही तासात या जिल्ह्यात अतीव्रुष्टीचा ईशारा
राज्यात आज पुढील काही तासात मुसळधार ते अतीमुसळधार तर काही ठिकाणी अतीव्रुष्टीचा अंदाज हवामान खात्याने जारी केलाय..मराठवाडा, विदर्भातील काही जिल्हे तसेच कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतीमुसळधारेचा आँरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे..
कुठे मुसळधार तर कुठे अतीव्रुष्टी होनार..
मराठवाडा ; जालना, संभाजीनगर, बिड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या सर्वच जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधारेचा आँरेंज अलर्ट जारी करन्यात आला आहे…
विदर्भ ; बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधारेचा आँरेंज अलर्ट तर विदर्भातील उर्वरित जिल्ह्यात जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्र ; संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार ते अतीमुसळधारेचा आँरेंज अलर्ट देण्यात आलाय तर मध्य महाराष्ट्रातील उर्वरित भागातही मुसळधारेचा यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे..
ईमेजमध्ये कोणत्या जिल्ह्यात कोनता अलर्ट देण्यात आलाय याबाबत सविस्तर माहिती दिली आहे… ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेयर नक्की करा…