लाडकी बहीण kyc ; आधारला मोबाईल नंबर लिंक नाही, काय करावे पहा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत eKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अर्जदार महिलेच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, अर्जदाराच्या स्थितीनुसार आणखी एका व्यक्तीच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.
ज्या महिला अविवाहित होत्या, त्यांच्या वडिलांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. तर, ज्या महिला विवाहित होत्या, त्यांनी त्यांच्या पतीचा आधार नंबर टाकायचा असून, त्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.
या दोन व्यक्तींच्या आधार कार्डवर लिंक आसलेल्या मो नंबरवर ओटीपी (OTP) आल्यानंतरच eKYC प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
ई-केवायसी प्रक्रियेत तुमच्या स्वतःच्या आधार कार्डासोबतच तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्डाचे तपशील तपासले जातात. याचा अर्थ, तुमची सर्व माहिती या ठिकाणी व्हेरिफाय (Verify) केली जाते, ज्यामुळे तुम्ही योजनेसाठी यशस्वीरित्या पात्र ठरता.
हे लक्षात ठेवा की सध्याच्या काळात eKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अंगठ्याच्या ठशाऐवजी (Fingerprint) केवळ ओटीपीच्या माध्यमातूनच प्रक्रिया पूर्ण होत आहे. यामुळे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे हे अनिवार्य झाले आहे.
जर तुमचा, तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल, तर काळजी करू नका! तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. साधारणपणे १८ नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी आहे. त्यामुळे, लवकरात लवकर जवळच्या आधार सेवा केंद्रावर जाऊन तुमच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक करून घ्या. जर आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असेल, तर १००% तुमची eKYC प्रक्रिया पूर्ण होईल.