मानीकराव खुळे ; संपूर्ण महाराष्ट्रावर अतीव्रुष्टीचे ढग, आजपासून पावसाचा धुमाकूळ
मानीकराव खुळे : मध्य व वायव्य बंगाल उपसागरादरम्यान स्पष्ट व ठळक आकारात रूपांतर झालेल्या हवेच्या कमी दाबाचे आज (शनिवारी २७ ला) सकाळ पर्यन्त हवेच्या तीव्र कमी दाबात रूपांत होउन चंद्रपूर, हिंगोली, पैठण, अहिल्यानगर मार्गे मुंबईकडे मार्गक्रमनाची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आजपासुन म्हणजे शनिवार दि. २७ सप्टेंबर पासुन दसऱ्यापर्यंतच्या 5 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
त्यातही अतिजोरदार पावसाचे जिल्हे व तारखा
शनिवार दि. २७ सप्टेंबर
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, व पुणे सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा व धाराशिव, लातूर, नांदेड
रविवार दि. २८ सप्टेंबर
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, छ. सं. नगर व पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा
सोमवार व मंगळवार दि. २९ व ३० सप्टेंबर
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, व नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा
२७ ते ३० सप्टेंबर या काळात राज्यातील सर्वच जिल्ह्यात पाऊस जोर धरनार आहे..बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे २७-३० दरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अतीव्रुष्टीची शक्यता आहे.
उघडीपीची शक्यता कधीपासून ?
शुक्रवार दि. ३ ऑक्टोबर पासुन पूर्णतः नव्हे परंतु काहीशी उघडीपीची शक्यता जाणवते.
जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे ह्या नद्यांच्या धरणातून पात्रात पुन्हा एकदा पूर पाण्याच्या विसर्गाची शक्यता जाणवते.
इतकेच!
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune