पंजाब डख म्हणतात राज्यात पुन्हा पाऊस, पेरणी कधी करावी, चक्रीवादळ येतंय….
पंजाब डख ; पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 ऑक्टोबर 2025 पासून ते 20 ऑक्टोबरपर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागांत भाग बदलत पाऊस पडणार आहे. हा पाऊस सर्वदूर नसून काही विशिष्ट भागांतच असेल, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीचे निर्णय घेताना जमिनीतील ओलावा लक्षात घेऊन घ्यावा आणी पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा.
16/ 20/ ऑक्टोबर दरम्यान पाऊस : ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढले आहे, त्यांनी 15 ऑक्टोबर रोजी सोयाबीनच्या सुड्या उघड्या असतील तर त्या झाकून घेण्याचे आवाहन केले आहे. कारण 16 ते 20 ऑक्टोबर दरम्यान पडणाऱ्या पावसामुळे नुकसान टाळता येईल.
या जिल्ह्यात पाऊस : 16 ऑक्टोबरला या पावसाची सुरुवात यवतमाळ, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये होणार आहे. त्यानंतर 17 आणि 18 ऑक्टोबरला इतर वेगवेगळ्या भागांत पाऊस पडेल आणि 19-20 ऑक्टोबरपर्यंत राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडत राहील, हा पाऊस मुसळधार नसेल.
रब्बी पेरणीसाठी तयारी आणि सल्ला: शेतकऱ्यांना हरभरा आणि ज्वारी पेरणीचा निर्णय घेण्यासाठी जमिनीतील ओलावा तपासण्याचा सल्ला दिला आहे. कांद्याचे बी टाकण्यासाठी देखील हे वातावरण अनुकूल असल्याचे सांगितले आहे. पेरणी करताना बियाण्यांना बुरशीनाशक लावण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून मर रोग लागणार नाही.