हरभरा पिकाचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणारे ‘टॉप ७’ वाण
हरभरा पिकाचे चांगले व्यवस्थापन करूनही अनेक शेतकऱ्यांना पाहिजे तसे उत्पादन मिळत नाही, याचे मुख्य कारण म्हणजे चुकीच्या वाणाची निवड. हरभऱ्याची पेरणी किंवा लागवड करण्यापूर्वी जर शेतकऱ्याला योग्य जातीची माहिती असेल, तर त्याची निवड करून चांगले उत्पादन घेणे शक्य होते. याच उद्देशाने, महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन देऊ शकणाऱ्या आणि प्रचलित असलेल्या ‘टॉप ६’ हरभरा वाणांची माहिती पाहुयात.
प्रमुख वाण आणि त्यांची वैशिष्ट्ये
जॉकी ९२१८ (Jaki 9218):
हा महाराष्ट्रात खूप प्रचलित असलेला अधिक कालावधीचा (१०५ ते ११० दिवस) वान आहे. हा वान भारी जमिनीत १२ ते १५ क्विंटल प्रति एकरपर्यंत उत्पादन देऊ शकतो. मर रोगाला कमी बळी पडनारा, आकर्षक टपोरे दाने आसलेला हा वान आहे.
विजय (Vijay):
हा कमी कालावधीचा (९० ते ९५ दिवस) वान असून, तोसुद्धा १२ ते १५ क्विंटल प्रति एकर उत्पादन देऊ शकतो.ज्या शेतकऱ्यांची हरभऱ्याची पेरणी उशिरा होते, त्यांच्यासाठी हा वाण उत्तम आहे.मर रोगाला कमी बळी पडनारा आणि एका घाट्यात दोन दाने आसनारा हा वान आहे.
दफ्तरी २१ (Daptari 21):
हा वान मर रोगासाठी (Wilt Disease) प्रतीक्षम (प्रतिबंधक) आहे. या वानामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो आणि त्यामुळे तो चांगले उत्पादन देतो. हा महाराष्ट्रात खूप प्रचलित आहे.