‘लाडक्या बहिणींचे’ eKYC मुळे हाल..आता eKYC चि चिंता मिटनार
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांसाठी सरकारने आता e-KYC करणे अनिवार्य केले आहे. मात्र, e-KYC प्रक्रियेत येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे..
साईटवर भरपूर लोड आसल्याने otp येत नाही त्यामुळे लाडक्या बहीणींना मोठ्या आडचनी येत आहेत.. रात्री जागून अनेक महिला ई-केवायसीची प्रक्रिया करत आहेत,एकूणच लाडक्या बहीणींच्या झोपेच आणि डोक्याचं खोबरं झालंय..
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
e-KYC का आहे अनिवार्य?
योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाख पेक्षा जास्त नसावे ही मुख्य अट आहे. या अटीची पूर्तता करण्यासाठी आणि योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने कुटुंबाची एकूण उत्पन्नाची माहिती तपासणे अनिवार्य केले आहे.
लाभार्थ्या महिलेच्या उत्पन्नासोबतच, आता विवाहित असल्यास पतीचे उत्पन्न आणि अविवाहित असल्यास वडिलांच्या उत्पन्नाचीही तपासणी केली जाईल.यामुळेच, सरकारने कुटुंबाची एकूण माहिती जाणून घेण्यासाठी पती किंवा वडिलांचे e-KYC करणे आवश्यक केले आहे.
होम पेजवरील e-KYC बॅनरवर क्लिक करून फॉर्म उघडा. लाभार्थ्याचा आधार क्रमांक (Aadhaar number) आणि कॅप्चा कोड (Captcha Code) नमूद करा…आणि OTP टाका..
त्यानंतर विवाहित महिलांनी पतीचा आधार क्रमांक आणि अविवाहित महिलांनी वडिलांचा आधार क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे…तोही OTP टाका
शासनाकडून आश्वासन आणि महत्त्वाच्या सूचना
महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी लाभार्थ्यांना लवकरच तांत्रिक अडचणी दूर करून e-KYC प्रक्रिया आणखी सोपी आणि सुरळीत केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
हि आहे अंतिम मुदत
सर्व पात्र लाभार्थ्यांनी पुढील महिन्यापर्यंत (जवळपास १८ नोव्हेंबर २०२५) e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.e-KYC वेळेत न केल्यास योजनेअंतर्गत मिळणारी मासिक आर्थिक मदत थांबवली जाईल.तसेच, कोणत्याही फसव्या (Fake) किंवा तृतीय-पक्ष (Third-party) संकेतस्थळावर e-KYC करू नये, कारण त्यामुळे गोपनीय माहिती चुकीच्या हातात जाण्याचा धोका आहे.