हरभरा पिकाचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणारे ‘टॉप ७’ वाण
हरभरा पिकाचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणारे ‘टॉप ७’ वाण
Read More
‘लाडक्या बहिणींचे’ eKYC मुळे हाल..आता eKYC चि चिंता मिटनार
‘लाडक्या बहिणींचे’ eKYC मुळे हाल..आता eKYC चि चिंता मिटनार
Read More
दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
Read More
अखेर राशनचे पैसे खात्यात जमा, १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा..पहा तुमचे आले का?
अखेर राशनचे पैसे खात्यात जमा, १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा..पहा तुमचे आले का?
Read More

हेक्टरी १७,००० रु. सरसकट पीक विमा: पहा कोनाला मिळनार..

हेक्टरी १७,००० रु. सरसकट पीक विमा: पहा कोनाला मिळनार..

राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मदतीचे मोठे पॅकेज जाहीर केले आहे . या घोषणेनुसार, प्रत्यक्ष नुकसान भरपाईसोबतच शेतकऱ्याला प्रति हेक्टर १०,००० रुपये अतिरिक्त मदत दिली जाणार आहे. तसेच, नुकसान भरपाईची मर्यादा दोन हेक्टरवरून वाढवून तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे. या मदतीसाठीची ‘केवायसी’ची अट रद्द करून आता थेट ॲग्री-स्टॅक (Agri-stack) च्या डेटाच्या आधारे मदत दिली जाणार आहे.

या सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पीक विमा भरलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १७,००० रुपये सरसकट पीक विमा नुकसान भरपाई देण्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे .

लाडकी बहिन मोबाईलवर ई केवायसी अशी करा – येथे क्लिक करा

पात्र शेतकरी आणि विम्याची प्रक्रिया

राज्यातील २९ जिल्ह्यांमधील २५३ तालुक्यांमध्ये, विशेषतः २०५९ महसूल मंडळांमध्ये १००% नुकसान झाल्याचे दाखवण्यात आले आहे .यामुळे, या महसूल मंडळांमधील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाची नुकसान भरपाई सरसकट मिळणार आहे, तसेच त्यांना पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा देखील मंजूर होणार आहे . ही घोषणा दिलासादायक असली तरी, पीक विम्याची रक्कम ‘ईल्ड बेस’ (उत्पादन आधारित) सूत्राने मंजूर होते, ज्यात मागील वर्षांची सरासरी उत्पादकता पाहिली जाते . अनेक वर्षांपासून उत्पादकता ढासळल्यामुळे, या सूत्राच्या आधारे पीक विम्याची रक्कम कधीही २५ हजार रुपयांच्या वर जाऊ शकत नाही. त्यामुळे घोषित केलेली १७,००० रुपयांची रक्कम ही अंतिम असू शकते, असेही संकेत मिळत आहेत.

Leave a Comment