लाडकी बहीन योजनेत या महिलांनी KYC करायला थांबा, लगेच पहा

लाडकी बहीन योजनेत या महिलांनी KYC करायला थांबा, लगेच पहा

 

ज्या महिला सरकारी नोकरीत आहेत किंवा ज्यांचे पती सरकारी नोकरीत आहेत आणि त्यांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला असेल, अशा महिलांनी सध्या KYC करू नये. जर त्यांनी KYC केली तर त्या सरकारी नोकरीत असल्याचे किंवा इन्कम टॅक्स भरत असल्याचे निष्पन्न होऊ शकते आणि त्यांना घेतलेल्या लाभाची रक्कम परत करावी लागू शकते. मात्र, ज्या महिला इन्कम टॅक्स ‘झिरो’ भरतात, त्या KYC करू शकतात.

 

काही लोकांचा असा गैरसमज आहे की सध्या KYC करू नये कारण बायोमेट्रिक पद्धतीने (अंगठा ठेवून) KYC सुरू होणार आहे. पण सध्या जर तुमची OTP द्वारे KYC होत असेल तर ती करून घ्या. ज्या महिलांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही, त्यांच्यासाठी लवकरच बायोमेट्रिक KYC ची सुविधा उपलब्ध होईल. ही सुविधा ग्रामपंचायत, आपले सरकार सेवा केंद्र, CSC सेंटर किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे उपलब्ध असे.

 

ज्या महिलांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही, त्यांनी आधी मोबाईल नंबर लिंक करून नंतर KYC करावी. सध्या वेबसाईटवर लोड असल्यामुळे KYC करताना OTP संबंधित समस्या येत आहेत. यासाठी तुम्ही पहाटे किंवा रात्री प्रयत्न करू शकता.

 

पती किंवा वडील नसलेल्या महिलांसाठी
ज्या महिलांचे पती वारले आहेत (विधवा) किंवा ज्यांचे वडील नाहीत आणि त्यांना KYC करताना दुसऱ्या आधार कार्डची (पती किंवा वडिलांचे) माहिती विचारली जात आहे, त्यांनी सध्या चिंता करू नये. अशा महिलांसाठी लवकरच वेबसाईटवर नवीन पर्याय उपलब्ध होईल, ज्यात त्यांना फक्त स्वतःच्या आधार कार्डवर किंवा पालकांच्या आधार कार्डवर KYC सबमिट करता येईल.

 

पुढील हप्ता कधी मिळणार?

 

पुढील हप्ता (सप्टेंबर महिन्याचा) दिवाळीपूर्वी महिलांच्या खात्यात येऊ शकतो. ज्या महिलांनी KYC केली आहे, त्यांना तो नक्की मिळेल. ज्यांनी KYC केलेली नसेल, त्यांना कदाचित थांबवले जाऊ शकते किंवा त्यांची KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हप्ता मिळेल. असेही होऊ शकते की सप्टेंबरचा हप्ता सर्व महिलांना मिळेल आणि KYC ची अट पुढील हप्त्यापासून लागू होईल.

Leave a Comment