राज्यात या तारखेपर्यंत सुर्यदर्शन, या तारखेनंतर पुन्हा पावसाचे वातावरण (पंजाब डख)
महाराष्ट्राचे हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यात ८ ऑक्टोबरनंतर पावसाने पूर्णपणे निरोप घेतला आहे, आणि ९ ऑक्टोबर आजपासून हवामान पूर्णपणे कोरडे व सोयाबीन काढणीसाठी पोषक राहनार आहे.
या तारखेपर्यंय कामे आवरा…
१५ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांनी आपली सर्व काढणीची आणि शेतीची कामे पूर्ण करून घ्यावीत, असा सल्लाही काही ठिकाणी डख यांनी दिला आहे, कारण त्यानंतर वातावरणात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे असे पंजाब डख यांनी सांगितले आहे.
सध्याची हि उघाड शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची आहे, कारण या कोरड्या हवामानामुळे सोयाबीन, मका आणि इतर काढणीस आलेल्या पिकांची सुरक्षितपणे काढणी करणे शक्य होणार आहे. आकाश निरभ्र राहून दिवसभर चांगले सूर्यदर्शन होणार असल्याने शेतकऱ्यांनी शेतीची कामे करून घ्यावी असे पंजाब डख यांनी सांगितले…
सध्या राज्यात मान्सूनच्या परतीची प्रक्रिया सुरू आहे. मोठ्या पावसाची शक्यता कमी असल्याने मान्सून लवकरच राज्यांतून माघार घेईल. यामुळे वातावरणात हळूहळू थंडावा वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी फक्त तात्काळ पिके काढून घेण्यावर लक्ष केंद्रित करावे.