राज्यात पावसाचा जोर वाढनार, या जिल्ह्यांना सतर्कतेचा ईशारा..

राज्यात पावसाचा जोर वाढनार, या जिल्ह्यांना सतर्कतेचा ईशारा..

 

बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाबाच्या प्रणाली पूरक ठरत आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. उद्यापासून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

 

तर पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे.

 

आज राज्यात संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी तर मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे आणि कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Rain Alert: पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा

 

शुक्रवारी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

 

Rain Forecast: पुढील पाच दिवस पाऊस कायम; शुक्रवार आणि शनिवारी जोर वाढणार
तर शनिवारी संपूर्ण कोकणातील पालघर वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर मध्य मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्हयासह मराठवाडयातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Leave a Comment