मानीकराव खुळे अंदाज ; या तारखेपर्यंत अतीमुसळधारेचा अलर्ट ऑक्टोबरमध्येही पाऊस
कोकण आणि विदर्भात (मुंबईसह) मात्र पावसाचे सातत्य टिकून राहणार असून, नजीकच्या काळात तिथे मोठी उघडीप मिळण्याची शक्यता कमी आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात (जिथे थोडी उघडीप होती) आता पुन्हा २५ ते २९ सप्टेंबर या दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे असा अंदाज मानीकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
२७, २८, आणि २९ सप्टेंबर या तीन दिवसांमध्ये चांगला जोरदार पाऊस अपेक्षित आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र (Low-Pressure Area) हे या पावसाचे मुख्य कारण आहे.
सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे, मान्सूनच्या परतीची तारीख ५ ऑक्टोबर असली तरी, मान्सून निघून जान्यासाठी यावर्षी विलंब होण्याची शक्यता आहे. – (मानीकराव खुळे)
ऑक्टोबरमधील पावसाची शक्यता आणि स्वरूप
सप्टेंबर अखेरपर्यंत पाऊस असला तरी, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात (साधारण १ ते ७-८ ऑक्टोबर) काहीशी उघडीप मिळण्याची शक्यता आहे. तथापि, कोकण, विदर्भ, मराठवाड्याचे काही भाग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, अहमदनगर जिल्ह्यांमध्ये २ ऑक्टोबरपर्यंतही जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे.
यावर्षी कमकुवत ‘ला-निना’ (La Nina) चा प्रभाव असल्यामुळे, ऑक्टोबरमधील रब्बी हंगामात देखील पावसाची शक्यता आहे. साधारण १० ऑक्टोबरच्या आसपास आणि त्यानंतर दिवाळीनंतर (१८ ते २० ऑक्टोबर) पावसाची शक्यता आहे. हा पाऊस सप्टेंबर इतका अति नसेल, पण दक्षिण महाराष्ट्र (कोल्हापूर, सांगली, सोलापूर) आणि मराठवाड्यातील (लातूर, धाराशिव) काही भागांत असण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी नियोजनाचा सल्ला
यावर्षी मान्सूनचा काळ जास्त टिकल्यामुळे आणि पावसाचे वितरण समान झाल्यामुळे कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी आहे. शेतकऱ्यांची सर्वात मोठी समस्या म्हणजे, शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी दहा दिवसांची शंभर टक्के उघडीप मिळणार नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन धाडस करून उपलब्ध असलेल्या दोन ते चार दिवसांच्या अल्प उघडीपीच्या काळात खालील कामे करणे आवश्यक आहे..
खरीप पिकांची (सोयाबीन, भात, कापूस) काढणी.
रब्बीची पेरणी दिवाळीनंतर (ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात) केल्यास, पिकाला आवश्यक असलेली डिसेंबर-जानेवारीतील कडाक्याची थंडी मिळणार नाही, त्यामुळे वेळेत पेरणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यंदा शेतकऱ्यांची कसोटी लागणार असून, हवामानाचा कानोसा घेऊन जोखीम पत्करूनच नियोजन करावे लागेल.