पाऊस घेनार विश्रांती, पाहा किती दिवस पाऊस उघडनार… तोडकर हवामान अंदाज

पाऊस घेनार विश्रांती, पाहा किती दिवस पाऊस उघडनार… तोडकर हवामान अंदाज

 

शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे २९ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर लक्षणीयरीत्या ओसरणार आहे. मराठवाडा, जवळपास संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्ण विदर्भ या सर्व प्रमुख भागांमध्ये पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज तोडकर यांनी व्यक्त केला आहे.

 

तोडकर साहेबांच्या अंदाजानुसार, २९ सप्टेंबरला महाराष्ट्रात तब्बल ९० ते ९५ टक्के भागात पाऊस उघाड देतोय. हा ‘उघाड’ सोयाबीन काढणीसाठी अत्यंत आवश्यक आहे, ज्यामुळे ओल्या दुष्काळातून वाचलेल्या सोयाबीनला घरात आणण्यासाठी थोडी संधी मिळेल…

 

उघाडाचा कालावधी आणि महत्त्वाचा इशारा

 

हा उघाड १००% स्वच्छ वातावरणाचा नाही, असा त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे. यामध्ये १०-५ टक्के भागांमध्ये स्थानिक वातावरणामुळे पाऊस होऊ शकतो, विशेषतः दुपारनंतर, ४-५ ह पाऊस काही ठिकाणी होऊ शकतो.त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले पीक झाकून-पाकून ठेवण्याची तयारी ठेवावी.

 

उघाड किती दिवस..?

 

मराठवाडा आणि विदर्भात ही संधी (उघाड) काही ठिकाणी २ ऑक्टोबरपर्यंत, तर काही ठिकाणी ३ ऑक्टोबरपर्यंत राहू शकते. परंतु, हा संपूर्ण ‘उघाड’ फक्त चार दिवसांचा आहे.त्यानंतर पुन्हा पाऊस येन्याची शक्यता आसल्याचं तोडकर यांनी सांगितलंय..

Leave a Comment