पाऊस घेनार विश्रांती, फक्त एवढेच दिवस…मानीकराव खुळे

पाऊस घेनार विश्रांती, फक्त एवढेच दिवस…मानीकराव खुळे

 

महाराष्ट्रातील सध्य:स्थितीतील तीव्र वातावरणीय प्रणालीमुळे देशात परतीच्या मार्गांवर असलेला मान्सून, शुक्रवार दि. ३ ऑक्टोबर पर्यन्त, (वेरावळ, भरूच, उज्जैन, झाशी, शहाजहाणपूर) ह्या शहरादरम्यानच्या सीमारेषेवर पुढील सप्ताहभर तरी आता जाग्यावरच थबकण्याची शक्यता जाणवते…(मानीकराव खुळे) त्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी वातावरण पूरकतेची शक्यता टिकून राहू शकते.

 

अपेक्षित असलेल्या कमी दाबाचे आज पहाटे तीव्र  कमी दाबात रूपांतर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दसऱ्यापर्यंत अपेक्षित असलेल्या जोरदार पावसाला ही प्रणाली पूरक ठरण्याची शक्यता कायम आहे…

 

पाऊस घेनार विश्रांती – मानीकराव खुळे

 

गेल्या आठवड्यापासुन हवेच्या तीव्र कमी दाब वातावरण प्रणालीच्या नेमक्या प्रभावी टप्प्यात सापडलेल्या दक्षिण मराठवाड्यातील जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी तसेच सोलापूर जिल्हा क्षेत्रात परवा नंतर म्हणजे मंगळवार दि. ३० सप्टेंबर पासुन २-३ दिवसासाठी पावसाची काहीशी उघडीप मिळू शकते असा अंदाज खुळे यांनी व्यक्त केलाय…

 
विदर्भ-मराठवाडा पूरजन्य परिस्थितीची शक्यता….

 

संपूर्ण मराठवाडा, विदर्भ व जळगांव, नाशिक, अ. नगर व सोलापूर अश्या महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात, मंगळवार दि. ३० सप्टेंबर पर्यंतच्या ४ दिवसात पूरजन्य परिस्थितीची शक्यता असुन धरण क्षेत्रातून नद्यांच्या पात्रात पुन्हा एकदा पूर पाण्याच्या विसर्गाची शक्यता जाणवते….

 

अंदमानजवळील कमी दाबक्षेत्र वायव्येकडे सरकणार-

 

मंगळवार दि. ३० सप्टेंबर दरम्यान अंदमानजवळ बं. उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्मिती व उत्तर व उत्तर मध्य भारताकडे त्याची मार्गक्रमण शक्यतेतून महाराष्ट्रात दि. ८-९ ऑक्टोबर दरम्यानच्या झोडापण्या स्वरूपाच्या रब्बी पावसाच्या चौथ्या आवर्तनाच्या अपेक्षित धोका सध्या तरी कमी होईल, असे वाटते. (माणिकराव खुळे Meteorologist (Retd) IMD Pune.)

 

दसऱ्यानंतर महाराष्ट्रात उघडीपीची शक्यता

 

शुक्रवार दि. ३ ऑक्टोबर पासुन महाराष्ट्रात पूर्णतः नव्हे परंतु काहीशी उघडीपीची शक्यता जाणवते. त्यामुळे कांदा बियाणे टाकणी, खरीपातील मका सोयाबीन बाजरी भुईमूग व अति आगाप धान सारख्या पीकांची काढणी, द्राक्षे-बाग छाटणी, वाफस्या नंतरच्या भाजीपाला पीक काढणी, हरबरा व ज्वारी पेरणी, रब्बीच्या पुढील इतर लागवडीसाठीची रानं तयार करणे, इत्यादीसारख्या शेतकामांचा दसऱ्यानंतर विचार होवु शकतो, अशी माहिती खुळे यांनी दिलीय…

 

मुंबईत मात्र दसऱ्यानंतरही जोरदार पावसाची शक्यता कायम जाणवते.

आज इतकेच!
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.

Leave a Comment