तुम्ही जर लाडकी बहिण योजनेसाठी पात्र असाल आणि अद्याप eKYC केली नसेल, तर तुमच्या मोबाइल मधूनही तुम्ही kyc करू शकता..मोबाइल मधून ई केवायसी कशी करायची याबाबत सविस्तर माहिती पाहूयात..
लाभार्थी महिलेचा आधार नंबर (Aadhaar Number) प्रविष्ट करा.दिलेला कॅप्चा (Captcha) जशास तसे खालील बॉक्समध्ये भरा.’मी सहमत आहे’ या टॅबवर टच करून ‘ओटीपी पाठवा’ (Send OTP) या बटनावर क्लिक करा.आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला सहा/दहा अंकी ओटीपी (OTP) टाका आणि ‘स्थापित करा’ (Verify) यावर टच करा.
पती/वडिलांची आधार माहिती (Husband’s/Father’s Aadhaar Details)
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
विवाहित असाल तर पतीचा आधार क्रमांक टाका.अविवाहित असाल तर वडिलांचा आधार क्रमांक टाका.पुन्हा दिलेला कॅप्चा (Captcha) भरा. ‘मी सहमत आहे’ या बटनावर टच करून ‘ओटीपी पाठवा’ यावर क्लिक करा.
त्यांच्या आधार नंबरशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाका आणि ‘स्थापित करा’ या बटनावर टच करा.
जातीचा प्रवर्ग आणि प्रश्नांची उत्तरे (Caste Category and Declarations)
तुमचा जात प्रवर्ग (Caste Category) योग्यरित्या निवडा.
‘तुमच्या कुटुंबात एखादी लाभार्थी नोकरीला नाही का?’ – होय करा
‘तुमच्या कुटुंबात फक्त एक किंवा दोनच महिला लाभ घेत आहेत?’ – होय करा.
दिलेल्या डिक्लेरेशन चौकोनाला (Declaration Checkbox) टच करून सहमत व्हा. ‘स्थापित करा’ (Verify) या बटनावर टच करा.
ही प्रक्रिया पूर्ण होताच तुमची eKYC यशस्वीरित्या कम्प्लीट होईल…